Marathi News | मराठी बातम्या

Vol 6. (Jan 01-15, 2020)

कार्डीनल ऑस्वल्ड मुंबई सरधर्मप्रांताचे आर्चबिशप म्हणून पुन्हा कार्यरत

२ जानेवारी २०२० रोजी संत पायस कॉलेज येथे झालेल्या धर्मगुरूंच्या सभेत मुंबई सरधर्मप्रांताचे चान्सलर फा. निल डॉस सान्तोस ह्यांनी घोषित केली कि, पुढील तरतूद होईपर्यंत पोप फ्रान्सिस ह्यांनी कार्डीनल ऑस्वल्ड ग्रेसियस ह्यांना मुंबई सरधर्मप्रांताचे आर्चबिशप म्हणून कार्य पुढे चालू ठेवण्याची विनंती केली आहे.

हे इटालियन भाषेतील अधिकृत पत्राचे मराठी भाषांतर आहे.

आदरणीय कार्डीनल

२४ डिसेंबर रोजी आपण आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण केलीत त्याबद्दल तुम्ही मुंबई सरधर्मप्रांताच्या आर्चबिशप पदाचा राजीनामा ८ नोव्हेंबर २०१९ रोजी पत्राद्वारे माझ्याकडे सादर केला तो राजीनामा अर्ज मी पोप महाशयाच्या परवानगीने ३० नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च पोंटीफ कडे सुपूर्द केला.

पुढची तरतूद होईपर्यंत पोप महाशयानी आपणास हा कार्यभार पुढे चालू ठेवण्याचे सांगितले आहे.

आपण मुंबई सरधर्मप्रांत, भारत आणि जगभरातील सर्व चर्चसाठी जी सेवा करीत आहात त्याबद्दल ख्रिस्तसभा आपले आभारी आहे. मला माझा स्वतःचा वैयक्तिक आदर आणि आपुलकी आपणास देण्याची परवानगी द्या आणि मी आपल्या वाढदिवशी आपणांस अभिवादन करतो.

ख्रिस्तामध्ये आपला बंधु

सही

कार्डीनल फिलोनी फर्नान्डो

प्रीफेक्ट, कॉंन्ग्रेगेशन फॉर द एव्हन्जलायझेशन ऑफ पिपल

सही

आर्चबिशप प्रोतास रुगाम्बवा

सेक्रेटरी

पोप बेनेडिक्ट १६वे ह्यांनी मुंबई सरधर्मप्रांताचे आर्चबिशप म्हणून कार्डीनल ऑस्वल्ड ग्रेसियस ह्यांची नियुक्ती केली होती. मुंबई, पुणे आणि बँगलोर येथील सेमनरीचे माजी प्राध्यापक, कार्डीनल ऑस्वल्ड ग्रेसियस ह्यांनी कॅनन लॉ मध्ये डॉक्टरेट व न्यायशास्रामध्ये पदवीधर आहेत. FABC, CCBI व CBCI ह्या प्रतिष्ठीत संस्थांचे ते सरचिटणीस आणि बऱ्याच काळासाठी अध्यक्ष पदावर कार्य केले आहे. कॅथोलिक बिशप ऑफ इंडिया (CBCI) दिल्ली ह्या बिशपांच्या समितीचे कार्डीनल ऑस्वल्ड ग्रेसियस हे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.

बुद्धी आणि आकार विकसित होत आहे

रविवार तारीख १२ जानेवारी २०२० रोजी निर्मला निकेतन चर्चगेट मार्फत सर्व महाविद्यालयीन आणि कार्यरत तरुणांसाठी पुढील सत्राचे आयोजन सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. (ह्यामध्ये न्याहारी, मिस्सा व दुपारचे भोजन असेल.) ह्या सत्राचे मुख्य वक्ते फा. नॉर्बट डिसोजा असतील. त्यांचा विषय ‘बुद्धी आणि आकार विकसित करणे’ आहे. नावनोंदणी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत केली जाईल. त्यासाठी रेना रॉड्रीक्स ह्यांना ९९६९९२८१४९ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा: नावनोंदणी फी ५०/- मात्र आकारली जाईल.

कॅथोलिक चर्चा

गेल्या नोव्हेंबर महिन्यात दादर येथे झालेल्या सरधर्मप्रांतीय युवा सल्ला मसलत समिती ‘बॉन फायर’ मार्फत चर्चमधील नैतिक शिकवण आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाशी असलेले त्यांचे छेदन बिंदू तसेच त्यांच्या आव्हानाबद्दल अधिक बोलण्याची विनंती युवकांमार्फत करण्यात आली. ह्याला अनुसरून संत फ्रान्सीस झेवियर चर्च, दाबुल व डायसिजन युवाकेंद्र वांद्रे ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ही संकल्पना ज्याला ‘कॅथोलिक चर्चा’ असे नाव दिले आहे की वेळोवेळी आयोजित करण्याचे योजिले.

रविवार तारीख १८ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ८ ते ९.३० वाजेपर्यंत संत फ्रान्सीस झेवियर चर्च, दाबुल येथे ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘वर्थ द वेट’ (थांबनेच योग्य आहे) वैवाहिक जीवनातील लैंगिक संबंधातील पावित्रता आणि भेटीगाटीतील पावित्र्य हा ह्या सायंकाळचा विषय असेल.

सरधर्मप्रांताच्या युवा कक्षाचे डिकन आयवन फर्नांडीस ह्यांनी स्वखुशीने ह्या कार्यक्रमासाठी वक्ते म्हणून स्वीकारले आहे. हे सत्र सर्व ख्रिस्ती युवकांसाठी खुले असून प्रवेश विनामुल्य आहे. तुम्हाला ह्या सत्रात सहभागी व्हायचे असल्यास, कृपया नावनोंदणीसाठी सियाना: ९००४३५३८९३ व एल्टन ९१३७४७१५२२ ह्यांना संपर्क साधावा.

आझाद कैदी : मनातील तुरुंग भिंती तोडणे

संत पायस कॉलेजच्या परंपरेनुसार ७ व ८ डिसेंबर २०१९ रोजी “आझाद कैदी” ह्या नावाचे हिंदी भाषिक वार्षिक नाटक सादर केले. नाटकासाठी एक ब्रिद वाक्य होते, ‘तुरुंगाच्या भिंतीमध्ये एक कथा न उलगडनारी परंतु ती आपल्यातील तुरुंग दर्शविते.’ सक्तीने धर्मांतर केल्याच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगणाऱ्या आपल्या सहकारी कैद्यास एखाद्या कैद्याने ठार मारल्यास तुरुंग रक्षकाकडून स्वातंत्र्य दिले जात असे. या नाट्य कथेतून प्रत्येक तुरुंग वासियाला स्वतंत्र्य म्हणजे काय हे स्पष्ट केले परंतु खरे स्वतंत्र्य म्हणजे काय हे कल्पनेतून कळते, हि ख्रिस्ताने दिलेली एक गोष्ट आहे जी मृत्यूच्या कक्ष बाहेर जाते. या नाटकाने प्रसार माध्यमाच्या तेजस्वी मृगजळाचा पर्दाफाश केला. तसेच आपल्या मनावरील स्वारस्थ आणि स्वार्थी वृत्तीचा तसेच या जगाच्या सूक्ष्म हाताळणी आणि क्षणभंगुर जगातील मोहांचा पर्दाफाश करण्यात आला होता. संत पॉलच्या शब्दातील ख्रिस्ताचा संदेश ‘जिथे परमेश्वराचा आत्मा आहे तेथे स्वतंत्र्य आहे. (१ करिंथ ३:१७) हा नाटकातील संदेश प्रखर आणि स्पष्ट दिसून येत होता.

ह्या नाटकाचे सूत्रबद्ध दिग्दर्शन फा. रायन अॅलेक्स ह्यांनी केले आणि ब्रदर क्लिफी फर्नांडीस ह्यांनी त्यांना सक्रीय सहकार्य केले. हे नाट्य रहस्य आणि विनोदांच्या क्षणांनी साकारले. सर्व नाट्य कलाकारांनी रंगमंच्यावर त्यांच्या मनमोहक अभिनयाने सर्वांची मने जिंकली. त्यांच्या सोबत सेमनेरीतील सर्व ब्रदर्सनी त्यांचे रोजचे सेमनरीचे घट्ट वेळापत्रक असून सुद्धा त्यांना नियुक्त केलेल्या विविध विभागगात एकमेकांना पाठींबा दर्शविला आणि एक कुटुंब एकसंघ म्हणून नाटकाच्या भव्य यशात मोठे योगदान दिले. ह्या वेळात सेमनरीचे रेक्टर आणि स्टाफचे सुद्धा सहकार्य लाभले. खरोखरच सेमनेरीमध्ये आम्हासाठी एक शिकण्याचे आणि आमचा अनुभव विकसित करण्याची संधी लाभली.

आम्ही आमचे सर्व उपकारकर्ते, शुभचिंतक, कुटुंब, शिक्षक, नातेवाईक आणि मित्र जे हा कार्यक्रम चालू ठेवण्यासाठी प्रत्येक वर्षी सहकार्य व साहाय्य करीत असतात त्यांचे आभारी आहोत. तुमचे प्रेम, उदार आर्थिक साहाय्य आणि प्रार्थना आम्हांस मदत करते. आणि आम्ही करत असलेल्या सर्व गोष्टीमध्ये सर्वात्कृष्ट सादरीकरण करण्यास प्रेरित करते. तुम्हा सर्वांना परमेश्वर आशीर्वादित करो !

- संत पायस कॉलेज – गोरेगाव

CSAPG चे आगमन काळातील चिंतन

कॅथोलिक सेक्रेटरीएट आणि अॅडमिनिस्ट्रेटिव प्रोफेशनल गिल्ड (CSAPG) हे एक असे व्यासपीठ आहे जिथे प्रापंचिक व्यावसायिक त्यांच्या कामाच्या क्षेत्रात ख्रिस्ती व्यावसायिक म्हणून ओळखले जातात.

शनिवार तारीख १४ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ४.३० वाजता साल्वेशन सभागृह, दादर येथे ऑफीस ऑफ ले कोलॅबरेशन इन मिनिस्ट्री (OLCM) ह्या संघनेच्या माध्यमातून आगमन काळलीन रेकलेशन आयोजित करण्यात आले होते. ओएलसीएमचे सदस्य श्री. रुबेन फ्रॉन्टेरो यांनी रेकलेशन येशूच्या जन्माचा आजच्या काळाशी व संबंधित परिस्थितीशी जुळवून घेणारे अर्थपूर्ण सत्र घेतले. त्यांनी त्यांच्या सत्रात म्हटले की नाताळ काळ हा फक्त गोड खाद्य पदार्थ, दिवे व सजावट करण्यापलीकडे आहे. आपल्या दैनंदिन जीवनात कामाच्या ठिकाणी आणि आपल्या वागणुकीने आपल्याला मिळण्याच्या अनेक संधीचा उपयोग देवाच्या इच्छेने इतरांवर प्रतिबिंबित कसे करता येऊ शकते ह्यावर भर देऊन अधिवेशनाची सांगता करण्यात आली.

सचिव आणि प्रशासकीय व्यावसायिकाना त्यांच्या व्यवसायात ख्रिस्ती असल्याचा आयाम अनुभवण्यासाठी व चर्चच्या मोहिमेमध्ये योगदान दिल्याचा आनंद शोधण्यासाठी (OLCM) कार्यालय आमंत्रित करण्याची संधी घेत असते. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता साल्वेशन चर्च, दादर येथे (CSAPG) संघाची सभा होत असते. आपण ख्रिस्ताबरोबर एक व्यावसायिक म्हणून कसे व्यस्त राहू शकता याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ह्या सभेस उपस्थित राहा. संपर्क: ९८१९३४०६८८

ख्रिस्ती शिक्षक संघ

१५ डिसेंबर २०१९ रोजी ख्रिस्ती शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली शालेय शिक्षकांचे आगमन काळीन स्नेहमेळावा OLCM प्रापंचिक कार्यालयामार्फत सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला होता.

मेळाव्याची सुरुवात फा. क्लिओफस ब्रॅगान्झा, SDB ह्यांच्या ‘SPREADING THE JOY’ आनंद पसरविणे ह्या विषयावर त्यांचे ज्ञानदायक सत्राने झाली. त्यांनी ख्रिस्ती शिक्षकांना पोप महाशयासचा संदेशाचा संदर्भ दिला आणि त्यामुळे शिक्षकांना स्व अनुभव सांगण्यास मदत झाली. ‘शाळा व शिक्षकांचे उद्दिष्ट म्हणजे सत्य, चांगले आणि सुंदर ह्या गोष्टीची योग्य समज विद्यार्थ्यामध्ये विकसित करणे होय.’ (ऑक्टो. २०१७) असे पोप फ्रान्सीस ह्यांच्या ह्या विषयावर फादरांनी शिक्षकांना समज दिली.

गटवार चर्चेतून फा. क्लिओफस ह्यांनी शिक्षकांना आपल्या शिक्षण संस्थेमध्ये आपली ख्रिस्ती ओळख आणि शिक्षणाची गुणवत्ता कशी राखू शकतात याबद्दल विचार करण्यास प्रोस्ताहीत केले. संघाच्या योग्य कार्यासाठी एक मध्यवर्ती समिती स्थापन्यात आली. उपस्थित शिक्षकांनी आपले अनुभव सांगितले आणि ह्या सायंकाळची सांगता प्रार्थनेने करण्यात आली.

CSA संस्थेच्या सहयोगाने आदीवासी उद्योजकांची मुंबई शहरास भेट

कातकरी समाजाच्या उद्धारासाठी सेंटर फॉर सोशल अँक्शन (CSA) सक्रियपणे कार्यरत आहे. आदिवासी स्री –पुरुषांना एकत्र करून त्यांचे बचत गट स्थापण्याचे कार्य CSA करीत आहे. ह्या आदिवासी गटांना स्थानिक कच्च्या मालापासून विविध खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

स्वयंसेवी संस्थांचे सामाजिक उपक्रम व त्यांचा उत्पादनाची बाजारपेठ करण्यास नवजीवन एन्टरप्रायझेस मदत कारले. ८० टक्के महसूल NEFT द्वारे आदिवासी बचत गटांच्या बँक खात्यात जमा केला जातो. ह्या रोजीरोटीच्या संधीमुळे आदिवासींचे स्थलांतरण रोखण्यास आणि त्यांच्या मुलांचे शिक्षण सक्षम करण्यास मदत करते.

कातकरी जमातीच्या विकासासाठी विविध कामांचा भाग म्हणून १९ डिसेंबर रोजी सेल्फ हेल्प गट हे माणगाव, पेन, रेस, खोपोली इ. रायगड जिल्यातील आहेत. वरील भागात CSA अमरदीप चँरिटेबल ट्रस्ट, आशा किरण, प्रेरणा चँरिटेबल ट्रस्ट, जनविकास केंद्र ह्यांच्या संयुक्त मदतीने कातकरी समाजासाठी कार्य करते.

दोन दिवसाच्या ह्या मुंबई शहराच्या भेट किव्हा सहलीसाठी ३० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. बहुतेक महिलांसाठी हि भेट पहिलीच होती. या प्रवासाचा एक भाग म्हणून त्यांनी गेटवे ऑफ इडिया, मरीन ड्राइव्ह, चौपाटी आणि शहरातील इतर आकर्षक ठिकाणांचे दर्शन घेतले. मुंबई शहराचे दर्शन त्यांच्यासाठी सुखद अनुभ होता.

दोन दिवसाची हि ट्रीप संपण्या अगोदर त्यांनी तयार केलेला माल विक्री होतो तिथे जाऊन भेट दिली. सर्वोद्या, गोरेगाव येथे त्याच्यासाठी खास कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. गीत गायन, खेळ, करमणूक आणि भोजन याद्वारे त्यांची दोन दिवसाची भेट अविस्मरणीय ठरली. सर्वांच्या ओठातून ‘झिंग, झिंग, झिंग, झिंगाट’ या गीतासारखे गोड शब्द बाहेर पडत होते.

अशाप्रकारे कातकरी समाजाला उंचावण्यासाठी आणि विकास समृद्धीसाठी हा उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरेल.

अशा अनेक उपक्रमांद्वारे सेंटर फॉर सोशल अक्शन अनेकात बदल घडवत आहेत. ह्या व अशा अनेक उपक्रम पाहण्यासाठी कृपया पुढील संकेत स्थळाला भेट द्या: www.csamumbai.in